ग्रामपंचायत परबवाडा

परिचय

ग्रामपंचायत परबवाडा

परबवाडा गाव म्हणजे स्वच्छतेचे जणू प्रतिकच आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे येथे सर्व लोकांमध्ये एकात्मता, आत्मीयता, तसेच  समभाव दिसुन येतो….
         परबवाडा ग्रामपंचायत च्या स्थापनेपूर्वी हा भाग उभादांडा ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट होता. त्यामुळे परबवाडा गावातील ग्रामस्थांना आवश्यक त्या  कामासाठी सुमारे दोन कि.मी. पर्यंत उभादांडा येथे जावे लागे. म्हणून गावातील ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न करून शासनाकडे विभक्त ग्रामपंचायतीची मागणी केली. या गावात परब आडनावाची लोकसंख़्या अधिक असल्याने तसेच वेंगुर्लेची ग्रामदेवता श्री देवी सातेरी चे मानकरी परब हे असल्यामुळे या गावाला परबवाडा असे नाव मिळाले. येथील ग्रामपंचायतीची स्थापना १९६४ साली  “परबवाडा ग्रामपंचायत” या नावाने करण्यात आली. परबवाडा गावामध्ये तीन पिंपळ हे ठिकाण वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणून ओळखले जाते. तसेच गावात श्री देव दाडोबा चे जागृत देवस्थान असून त्याच्या बाजूलाच एक निसर्गरम्य असा तलाव आहे. या तलावातील पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो. तसेच परबवाडा गावात दाडोबा पाणीवाटप संस्था देखील कार्यरत आहे.
       परबवाडा गाव अतिशय निसर्गरम्य असून समुद्रसपाटी पासून जवळ आहे. हा गाव वेंगुर्ले शहराच्या जवळच असल्यामुळे आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच वाहतुक, दळणवळण करणेदेखील सुलभ जाते. परबवाडा गाव कृषीप्रधान असून या गावात भात हे पिक प्रमुख असून नाचणी, मिरची, भाजीपाला यांसारखी रब्बी पिके देखील घेतली जातात. त्याचप्रमाणे आंबा, नारळ, चिंच, काजू, चिकू इत्यादी प्रकारची फळझाडे ही आहेत. त्यामुळे येथील लोकांच्या आर्थिक उत्पन्नामध्येही वाढ झालेली दिसून येते. परबवाडा गावाच्या जवळच सुमारे १ कि.मी. च्या अंतरावर वेंगुर्ले बाजारपेठ आहे. येथेच गावातील लोकांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात.

ग्रामपंचायतीची रचना

ग्रामपंचायतीचे नाव :- ग्रामपंचायत परबवाडा

स्थापना :- सन १९६६

0
महसूल गावे संख्या
0
सदस्य संख़्या
0
एकूण वाड्यांची संख़्या
एकूण लोकसंख़्या
एकूण पुरूष संख्या
एकूण स्त्री संख्या
0
एकूण वॉर्ड संख़्या
एकूण कुटुंब संख़्या
दारिद्र्यरेषेखालील कुटुंब संख़्या

ग्रामपंचायत परबवाडा

परबवाडा गाव म्हणजे स्वच्छतेचे जणू प्रतिकच आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे येथे सर्व लोकांमध्ये एकात्मता, आत्मीयता, तसेच  समभाव दिसुन येतो.

संपर्क

ग्रामपंचायत कार्यालय परबवाडा
गाव : परबवाडा
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
संपर्क क्र. (०२३६६) २६२४९१
ई-मेल : parabwada07@gmail.com

Scroll to Top